बातम्या

कृषी खात्याला गेल्यावर्षापासून कोणीच वाली नाही

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात कृषी खाते दुर्लक्षित राहिल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खाते स्वतःकडे ठेवले होते. त्यानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला. पाटील यांच्याकडे महसूल, मदत पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम, अशी खाती आहेत. अशातच ते गेले वर्षभर मराठा आरक्षण आंदोलन, दुष्काळी उपाययोजनांमध्ये अडकल्याने कृषी खात्याकडे लक्ष देताना त्यांची दमछाक होत आहे.

कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सप्टेंबरपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे दिला आहे. फडणवीस यांनी गेल्या नऊ महिन्यांत अनेक विभागांतील सचिवांच्या बदल्या केल्या. परंतु, कृषी खात्यासाठी पूर्णवेळ सचिव देणे त्यांना जमले नाही.

Web Title: Agriculture Department Minister Secretary State Government

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kashmir Accident News: काश्मीरमध्ये टॅक्सी नदीत कोसळून ४ पर्यटकांचा मृत्यू; तर दोघे बेपत्ता

PM Modi In Karad : उदयनराजेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज कराडमध्ये सभा; जाणून घ्या वाहतुक बदलासह पार्किंगची व्यवस्था, Video

Relationship Tips: मुलांच्या 'या' स्वभावावर मुली भाळतात

Gurucharan Singh Missing Case : 'तारक मेहता...' फेम सोढीचं शेवटचं लोकेशन सापडलं; बेपत्ता झाल्यावर ३ दिवस ‘इथं’ मुक्काम, एटीएममधून पैसे काढले अन्…

Sonalee Kulkarni: अप्सरा हो तुम या कोई परी...

SCROLL FOR NEXT