बातम्या

ज्युनिअर इंदोरीकर लग्नाच्या बेडीत, हरिनाम सप्ताहात चढले बोहल्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क

कर्जत: कीर्तनकार, प्रबोधनकार करणारी मंडळी प्रत्येकवेळी आपल्या भाषणातील आदर्शाप्रमाणे वागतातच असे नाही. परंतु कर्जत तालुक्यात एक महाराज जसे बोलले तसे वागले. त्याचं नाव ज्ञानेश्वरमहाराज पठाडे. कर्जतचे हे महाराज लग्नबेडीत अडकले आहेत. स्वतः काल्याचे कीर्तन केले आणि बोहल्यावर चढले. त्यांच्या या प्रागतिक विचारांचीच चर्चा सध्या वारकरी मंडळींत सुरू आहे. महाराष्ट्रात ते ज्युनिअर इंदोरीकर महाराज या नावाने प्रसिद्ध आहेत.

वधू-वरही कीर्तनकार

इंदोरीकरांसारखीच कीर्तनशैली. तशीच शरीरयष्टी. भाषेतील ग्राम्य लहेजाही तोच. टाळी वाजविण्याची, हात जोडण्याची तीच लकब. म्हणून लोकांनीच त्यांना ही उपाधी दिली आहे. त्यांनी कोणताही गाजावाजा न करता हरीनाम सप्ताहात आपले लग्न उरकले. नवरीही कीर्तनकार आहे.

मुलाने साध्या पध्दतीने लग्न लावून आदर्श निर्माण केल्याने पठाडे महाराजांच्या आईने त्यांना अभिमानाने कडेवर उचलून घेतलं.

या लग्नसोहळ्याला कीर्तनकार, टाळकरी व वारकरी वर्हाडी होते. राज्यभरातून आलेली राजकीय सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा उद्योग क्षेत्रातील मंडळी तसेच प्रसिद्ध कीर्तनकार केशव महाराज उखळीकर उपस्थित होते. 

अखंड हरिनाम सप्ताहात या दोन वर-वधू कीर्तनकारांनी परस्परांना वरमाला घातल्या. या वेळी मंडपात उपस्थित हजारो भाविकांनी पुंडलिका वर दे हरि विठ्ठल चा गजर करीत अक्षतासह त्या विवाहबद्ध झालेल्या उभयतांवर फुलांचा वर्षाव केला.

लग्न सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ज्ञानेश्वरमहाराज पठाडे.

झी टॉकीजवर कीर्तन
पठाडे महाराज यांचे मन मंदिरा आणि गजर कीर्तनाचा या झी टॉकीजवरील कीर्तन मालिकेमुळे अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले. विनोदी शैलीत कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे कर्जत तालुक्याचे सुपुत्र  ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज व हभप रुपाली हुमे हे विवाह बंधनात अडकले. रूपाली या अौरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील हभप आहेत. 

हे मान्यवर उपस्थित होते

या वेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, विद्यमान नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रोजगार हमी समितीचे काका धांडे, भाजपचे अशोक खेडकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराजे, युवक नेते ऋषिकेश धांडे, सुरेश खिस्ती, मिठू धांडे यांच्यासह चाळक महाराज, बांधकाम व्यावसायिक प्रा. शहाजी देवकर, भीमराव नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवरदेवाला आईने कडेवर घेतलं

माऊली पठाडे महाराज नेहमी कीर्तनात सांगतात, व्यसन करू नका. आई-वडीलांसारखे मोठे गुरू नाही. मुलगा कितीही मोठा झाला, तरीही ते बाळच असते. माझी आई अजून मला कडेवर उचलून मुका घेते. याची प्रचिती लग्नसोहळ्यातच आली. माऊली पठाडे महाराजांनी रुपाली यांना वरमाला घातल्यानंतर त्यांच्या आईने नवरदेवाला कडेवर उचलून घेतलं.

कीर्तनात लावली ३०० लग्न 
या वेळी माऊली पठाडे महाराज म्हणाले, आम्ही नेहमी सांगतो की साधेपणा ठेवा ,सप्ताहात विवाह करा या प्रबोधनाची सुरुवातच स्वतः पासून केली आहे. आजपर्यंत राज्यातील सुमारे 300च्या वर युवकांची काल्याच्या कीर्तनात लग्न लावून दिली आहेत. त्यामुळे मलाही कीर्तनात लग्न करावंच लागेल, यात काही शंका नव्हती.

Web Title Junior Indorekar Gets Stuck In Marriage

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT