बातम्या

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होणार? सागरी गस्त कडेकोट

सकाळ न्यूज नेटवर्क

अलिबाग: समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर पोलिसांची सागरी गस्त कडेकोट करण्यात येत आहे. त्यासाठी ताफ्यात चार नौका घेण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा किनारा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने आमदार अनिकेत तटकरे यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात 20 बंदरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. 
जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर 15 ऑगस्टनंतर सागरी गस्त वाढविण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षेबाबत इशारा दिला होता. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. 
रायगड पोलिस 4 नौकांद्वारे सागरी गस्त घालतात. त्यामध्ये भाडेतत्त्वावारील आणखी 4 नौकांचा समावेश होणार आहे. सागरी गस्तीसाठी एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोग्राम) राबवला जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली. 

31 तारखेला जलवाहतूक सुरळीत होणार आहे. प्रवासी बंदरांमध्ये तपासणी वाढविण्यात येणार आहे. सागरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस पोलिस गस्त घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रातही ही नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्‍य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने त्यांचा वापर देशविघातक कारवायांसाठी होऊ शकतो, असा इशारा सुरक्षा यंत्रणांचा आहे. याअगोदर अनेक वेळी रायगड जिल्ह्यातील बंदरांचा स्फोटके उतरविणे, तस्करी यासाठी उपयोग झाला आहे; तर अपुरे मनुष्यबळ, सुरक्षा साधनांची कमतरता यामुळे नौदलाने 20 बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला आहे. 

अशी आहे सुरक्षा व्यवस्था 
- संवेदनशील मासेमारी बंदरांवर टोकन पद्धत 
- बाहेरच्या संशयास्पद नौकांना बंदरात प्रवेश बंदी 
- सागरी सुरक्षा रक्षकांकडून 24 तास पहारा 
- प्रवासी जेट्टींवर शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची गस्त 
- तटरक्षक दलाची हेलिकॉप्टरद्वारे टेहळणी 
- मच्छीमारांना संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना 

भारत-पाकिस्तान बिघडलेल्या संबंधानंतर सागरी सुरक्षा अधिक कडेकोट केली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून ती कडेकोट आहे. 31 ऑगस्टनंतर जलवाहतूक सेवा सुरू होणार असल्याने प्रवासी जेट्टींवरही तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. 
- अनिल पारस्कर, पोलिस अधीक्षक, रायगड 


Web Title: Edge secured


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

Relationship Tips : काय सांगता! किस केल्याने वजन कमी होतं; संशोधनातून मिळाली महत्वपूर्ण माहिती

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

Special Report : Thane MP News | दिघेंचा कोणता चेला ठाण्यातून गुलाल उधळणार?

Special Report : Share Market जगात पुन्हा हर्षद मेहता घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार?

SCROLL FOR NEXT