बातम्या

फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर

सकाळ न्यूज नेटवर्क

कॅलिफोर्निया : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे "फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टोकरन्सी सादर करणार आहे. हे एक सुरक्षित चलन असणार असून, फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी वापरता येईल, असा दावा फेसबुकने केला आहे. 

लिब्रा या क्रिप्टोकरन्सीचा जगभर प्रसार, प्रचार आणि वापर वाढावा, यासाठी फेसबुक आता जगभरातील अनेक लोकप्रिय ब्रॅंडसोबत करार करणार आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सहजपणे व्यवहार करण्यासाठी फेसबुक अतिसुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्मवर करीत असून, यामध्ये लिब्रा क्रिप्टोकरन्सी येण्याची शक्‍यता आहे. यावर सध्या चाचणी सुरू असून, भविष्यात लिब्राकरन्सीमार्फत फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्‌सऍपद्वारे पेमेंट करता येईल. 

गेल्या वर्षी बिटकॉइन या "क्रिप्टोकरन्सी'ने 19,783 अमेरिकी डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून "क्रिप्टोकरन्सी' सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजिटल पैशांचे व्यवहारही करता येणे शक्‍य होणार आहे. हे डिजिटल कॉइन्स मेसेजप्रमाणेच समोरच्याला सेंड करता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये मूल्य असेल. यानुसार ठरावीक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत. क्रिप्टोकरन्सी कोणतीही बॅंक नियंत्रित करीत नाही. 

प्रकल्पाची तपासणी होणार 
भारतामध्ये मात्र क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही. शिवाय, जगभरातील बऱ्याच देशांनीदेखील क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे फेसबुकच्या क्रिप्टोकरन्सीला भारतासह इतर देशांत कायदेशीर मान्यता मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय अमेरिकी कॉंग्रेसही "फेसबुक लिब्रा' (Libra) या क्रिप्टोकरन्सीच्या प्रकल्पाची तपासणी करणार आहे. त्यामुळे कंपनीला "फेसबुक लिब्रा' लॉंच करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Facebook launches Cryptocurrency in bid to shake up global finance

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT