बातम्या

उत्तराखंडचा उद्दाम भाजप आमदार ; ४-४ बंदुका नाचवतानाचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क

दारु पिऊन झिंगाट झालेले हे आहेत भारताचे आदरणीय लोकप्रतिनिधी प्रणव सिंह चँपियन. एका हातात दारुचा ग्लास, दुसऱ्या बंदुक... कधी दोन्ही हातात बंदुका... कधी तोंडात... त्यात आजुबाजुला चेव आलेले समर्थक... हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

नशेत झिंगलेल्या या भाजप आमदाराला कसलंही भान राहिलं नव्हतं. ठणाठणा वाजणाऱ्या म्यझिकमुळ सगळ्यांना जास्तच चेव चढला होता. बरं या आमदाराच्या बाबतीत हे काही पहिल्यांदा नाही घडलंय. बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळं प्रणव सिंह आधीच पक्षातून निलंबित आहेत. पायाचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते. पण सेलिब्रेशनच्या नादात रंगाचा बेरंग झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही.

बरं आजुबाजुची पिलावळं प्रणव सिंहांना आणखीच चिथवत होती. उत्तराखंडमध्ये हे फक्त तुम्हीच करु शकता असं ते म्हणत होते, त्यावर प्रणव सिंहांचा आणखीच उत आला, फक्त उत्तराखंड नाही, तर संपुर्ण भारतात असं कोणी करु शकत नाही असं म्हणत त्यांनी तोंडात बंदुक धरली. 

लोकप्रतिनिधी नेमकं जसं वागलं पाहिजे त्याच्या थेट उलटं प्रणव सिंह आजपर्यंत वागत आलेत. त्यामुळं अशा बेजबाबदार आणि उद्दाम आमदाराला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरतेय.

WebTitle : marathi news bjp mla caught dancing with 4 guns in hand video viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

Bharat 6G: भारताकडून 6G साठी मोठं पाऊल, इंटरनेटचा स्पीड आणखी वाढणार; युरोप इंडस्ट्री अलायन्ससोबत करार होणार?

Amravati Loksabha: मतटक्क्याला झळ! अमरावती लोकसभेत ६.६७ लाख मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ

SCROLL FOR NEXT