बातम्या

पोलिस कर्मचाऱ्याला ठाण्यात जाऊन कॉलर पकडून मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क

बीड - ‘मुलाला पोलिस ठाण्यात का आणले,’ या कारणावरून एकाने पोलिस कर्मचाऱ्याला ठाण्यात येऊन शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २२) रात्री शिवाजीनगर ठाण्यात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सुधीर शिंदे असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांच्या चार्ली पथकातील सचिन पवार यांनी सुधीरच्या मुलाला मित्रनगर भागात पकडून पोलिस ठाण्यात आणले होते. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने सचिन पवार यांच्यासोबत अरेरावी केली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. येथे त्याचे वय कमी असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याऐवजी नातेवाइकांना बोलावून घेत समज देण्यात आली. ही माहिती सुधीर शिंदे यालाही दिली होती. त्याने आपण बीडला आल्यावर हे प्रकरण पाहून घेऊ, असे पोलिसांना सांगितले होते.

मंगळवारी शिवाजीनगर ठाणे हद्दीत सचिन पवार आणि खंडागळे हे दोघे गस्त घालत होते. रात्री आठला सचिन पवार यांना सुधीर शिंदेचा फोन आला. त्याने पवार यांना शिवीगाळ केली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझ्या मुलाने काहीही केले तरी तुला काय करायचे, असे म्हणत अरेरावी केली. पवार यांनी त्याला ठाण्यात बोलावले. रात्री बाराला पवार ठाण्यात येताच, ‘तूच का पवार,’ असे म्हणत त्यांची कॉलर पकडली आणि मारहाण करण्यास सुरवात केली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव केली. त्यानंतर सुधीर शिंदे याला शहर पोलिस ठाण्यात हजर करून शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. सध्या तो शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.

Web Title: police beating in the police station in beed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT