बातम्या

ठाकरे सरकारला भाजपचा धक्का? पुन्हा वापरणार ऑपरेशन 'लोटस'

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत आले. ठाकरे सरकारला सत्तेत येऊन आता तीन महिने झाले आहेत. भाजपने सत्तेत येण्यासाठी खुप आटापीटा केला परंतू ज्येष्ट नेते शरद पवार यांनी तीन पक्षांना एकत्रित करत भाजपच्या सत्तेत येण्याच्या सर्व आशांवर पाणी पाडले. यामुळे चिडलेल्या भाजपने आता कर्नाटकमध्ये स्थापन केलेल्या सरकारच्या पार्शवभूमीवर आता महाराष्ट्रात देखील 'ऑपरेशन लोटस' चा प्रयोग केला जाणार असल्याची चर्चा आहे.  

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे येत आहे. त्याचाच फायदा घेत भाजप ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे भाजपचे हायकमांड सध्या दिल्लीत व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' सुरू होणार असल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. सरकार किती दिवस टिकेल याची कुणालाच शाश्वती नसल्याने सगळेच जण आपलं काम दिसून यावं म्हणून धडपड करत आहेत. त्यामुळे श्रेयाचं राजकारणही सुरू झालंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं त्या मानाने चांगलं सुरु असल्याने काँग्रेस अस्वस्थ आहे. त्यातून कुरबुरी वाढत आहेत.

ही स्थिती लक्षात घेऊन भाजपमधला एक गट हा 'ऑपरेशन लोटस'साठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोण सोबत येवू शकेल याची चाचपणही करण्यात येत आहे. तर भाजपमधल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं वाटतंय. शिवसेनेस सोबत घ्यायला आम्हाला काहीही अडचण नाही अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली आहे.

भाजपमधलाच एक गट फुटून निघण्याच्या तयारीत असून त्यांना थोपविण्यासाठी भाजपचे नेते अशा बातम्या पेरत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली.

Web Title: after delhi election bjp will try to form government in maharashtra again operation lotus

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT