बातम्या

माओवाद्यांच्या हल्ल्यात अधिकाऱ्यासह बीएसएफचे चार जवान शहीद

सकाळ न्यूज नेटवर्क

कांकेर : छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका अधिकाऱ्यासह बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तसेच आणखी दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी जवानांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीवर माओवाद्यांकडून बहिष्कार घालण्यात आल्याने सर्वत्र जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सीमा सुरक्षादलाचे जवान कोम्बिंग ऑपरेशन करत असताच माओवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला. यानंतर जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

माओवाद्यांना प्रत्युत्तर देत असताना चार जवान हुतात्मा झाले. पखांजूर येथील प्रतापपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहल्ला जंगल परिसरात माओवादी आणि जवानांमध्ये ही चकमक उडाली. चकमकीबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. आताही परिसरात चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: 4 BSF jawans killed in encounter with Naxals in Chhattisgarh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT