बातम्या

VIDEO | कल्याण ते कसारा रेल्वेसेवा ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क

कल्याण : नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास एका वाळूच्या डंपरने आंबिवली रेल्वेच्या गेटला जोरदार धडक दिल्याने कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान पाच ते सहा असा एक तास रेल्वे सेवा ठप्प होती. 6 वाजून 10 मिनिटाला सेवा पूर्वरत झाली मात्र सकाळी कसारा ते कल्याण आणि मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासी वर्गाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

मध्य रेल्वेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता. 3) पहाटे पाचच्या सुमारास शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान वाळूच्या डंपरने लेव्हल क्रॉसिंग करत असताना रेल्वे गेटला जोरदार धडक दिली. डंपरने धडक दिल्यावर लॉकिंग बेसमधून बाहेर आल्यानंतर एलसी बूमने ओएचई वायरला स्पर्श केला. ओएचई वायर तुटल्याने त्या परिसरात ब्लॉक घेत दुरुस्तीचे काम केले त्यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच 6 वाजून 10 मिनिटाला काम पूर्ण होताच कल्याण ते कसारा रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्याने रेल्वे प्रवासी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला मात्र एक तास दहा मिनिटं लोकल सेवा बंद राहिल्याने प्रवासी वर्गाचे हाल झाले.

यात कल्याण कसारा उपनगरीय लोकल सेवा अणि अप मार्गावरील नंदीग्राम एक्सप्रेस ,विदर्भ एक्सप्रेस ,गोरखपुर एक्सप्रेस , देवगिरी व नागपुर दुरांतो एक्सप्रेस या गाड्याना फटका बसला . 

पहाटे 5 च्या सुमारास आंबिवली रेल्वे गेट वर वाळूच्या डंपरने धडक आणि दुरुस्ती नंतर रेल्वे सेवा पूर्वरत झाली तरी कल्याण ते कसारा अर्धा ते पाऊण तास लोकल सेवा उशीरा धावत असल्याने कसारा, आसनगाव, खडवली, वासींद, टिटवाळा, शहाड, आंबिवली रेल्वे स्थानक मध्ये रेल्वे प्रवासी वर्गाची तोबा गर्दी झाली होती. 

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नेहमी प्रमाणे रिक्षा चालकांनी टिटवाळा ते कल्याण रेल्वे स्थानक 100 ते दिडशे रुपये भाडे घेत प्रवासी वर्गाची लूटमार केली. 


पुन्हा एकदा रेल्वे च्या भोंगळ कारभार मुळे प्रवासी वर्गाला नवीन वर्षात ही त्रास सहन करावा लागणार आहे त्यासोबत आंबिवली गेट जवळील कल्याण डोंबिवली महानगर पालिका धीम्या गतीने उड्डाण पूल बनवीत असल्याने आज प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागला याबाबत राज्य सरकार ने त्वरित लक्ष्य घालायला हवे अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना श्याम उबाळे यांनी केली आहे . 

वाळूच्या डंपर ने आंबिबली गेट ला धडक दिली कसारा रेल्वे सुरक्षा बलाने डंपर आणि चालकाला ताब्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केले आहे .6 वाजून 10 मिनिटाला कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान सेवा पूर्वरत झाली असली 10 ते 15 मिनिटं कल्याण ते कसारा दरम्यान लोकल सेवा उशिरा धावत असली तरी काही काळात ती पूर्व पदावर येईल अशी माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली .

Web Title: Kalyan To kasara railway stopped due to accident

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Health Insurance: आरोग्य विम्याचा लाभ मिळेना; ४३ टक्के लोकांचे दावे रखडले, अहवालातुन धक्कादायक खुलासा

Crying Benefits : काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे; वाचा अश्रूंचं महत्व

Summer Tips: कडक उन्हातून घरी आल्यावर या '५' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र सोशल मीडियाव व्हायरल

SCROLL FOR NEXT