Sanjay Rathod
Sanjay Rathod 
बातम्या

मंत्रीपद गेल्यानंतर संजय राठोडांनी सुरु केला महाराष्ट्र दौरा

साम टीव्ही ब्युरो

वसई : वसईत (Vasai)  माजी वन राज्यमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात वसईतून केली असून, आज त्यांनी वसई पूर्वेकडील देवीपाडा (Devipada) येथील लोकांची भेट घेतली.Ex Minister Sanjay Rathod Started His Maharashtra Tour from Vasai

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर शिवसेनेतूनही (Shivsena) अप्रत्यक्ष टीका झाली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले.

वसईत माजी वनमंत्र्यांच्या दौऱ्यात मात्र सोशल डिस्टंटचा फज्जा उडालाचे चित्र दिसून आले आहे. वसईच्या शासकीय विश्रामगृहात राठोड आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी लोकांना गर्दी केली होती. यावेळी वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, मी सर्वांना आवाहन करतोय की सर्वांनी नियम पाळा ,कोरोनाला घाबरू नका, आणि स्थलांतर करू नका असे त्यांनी लोकांना आव्हान केले आहे. 

"माझ्या कठीण प्रसंगात समाजाने मला पाठीशी राहून साथ दिली. पण आता वाढत्या कोरोना (Corona) प्रादुर्भाव काळात समाजाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी नरवीर चिमाजीअप्पां च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून आपण महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहोत,'' असे त्यांनी यावेळी केले. Ex Minister Sanjay Rathod Started His Maharashtra Tour from Vasai

कोरोनाच्या भीतीने माझ्या समाज बांधवाने स्थलांतर करू नये, म्हणून त्यांच्या समस्या सरकारी दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाला घाबरून न जाता त्याच्या नियमाचे पालन करा, असे आवाहन माजी वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. 

Edited By - Digambar Jadhav. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT