maratha reservation  
बातम्या

"एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण" मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचा नारा

- सिद्धेश सावंत

बीड  : "एकच मिशन, मराठ्यांच ओबीसी करण" असा नारा देत मराठवाडा Marathwada मराठा आरक्षण संघर्ष समितीने, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी केलीय. यासाठी मराठवाडा मराठा Maratha आरक्षण संघर्ष समितीने, ठीक ठिकाणी बैठका घेण्यास सुरुवात केली असून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.  Demand to get reservation to the Maratha community in OBC

ओबीसी OBC हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारचं. असा निर्धार सुद्धा यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे Pradeep Salunkhe यांनी बोलून दाखवला आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अगोदरच ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण Reservation रद्द झाल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक आहे. त्यातच आता मराठा समाजाला  ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी Demand करण्यात येत आहे. 

मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं असल्याचा दावा यावेळी प्रदीप सोळुंके यांनी केला आहे. हैदराबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळालाय. मात्र मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला आहे.

हे देखील पहा -

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून शिक्षण आणि नोकरीतील अनुशेष भरून निघावा. यासाठी छावा मराठा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात High Court याचिका देखील दाखल केली आहे.

केवळ आरक्षणामुळे मिळाल्याने मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे इतर प्रश्नाकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यावे.असं देखील सोळुंके म्हणाले. दरम्यान मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीत समावेश करा. या मागणीमुळे आता मराठा - ओबीसी नवा वाद Conflict निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांचा पाशा पटेल यांना लगावला टोला

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

Holi Special Gujiya Recipe : किचकट काम होईल सोपं, 10-12 गुजिया एकाच वेळी बनतील, फक्त वापरा 'ही' ट्रिक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केल्यानंतरही लगेच नाही मिळणार १५०० रुपये, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT