Baramati police caught the thief in a filmy style
Baramati police caught the thief in a filmy style 
बातम्या

चोर पुढे पुढे आणि पोलीस मागे मागे ! फिल्मी स्टाईलने पोलीसांनी चोराला पकडले

विनोद जिरे

बारामती : बारामतीतील Baramati एमआयडीत MIDC चोरी झालेला ट्रक जेजुरी jejuri हद्दीत पोलीसांनी फिल्मी स्टाईलने पकडला आहे. काल रात्री एमआयडीमधून ट्रक चोरीला गेला होता.  मात्र ट्रकला जीपीआरएस लावलेला होता.  त्याचा पाठलाग बारामती पोलिसांनी हुशारीने केला. आणि चोराला पकडले आहे. Baramati police caught the thief in a filmy style

परंतु  हा चोर, चोरी करून निघालेला ट्रक, गाडी कुणाला ओव्हर टेक करू देत नव्हता. मोरगावमध्ये पोलिसानी बॅरिगेट लावले ते सुद्धा तोडून तो ट्रक पुढे गेला. सोबतच एका पिकअपचा चुराडा सुद्धा या ट्रकमुळे झाला. बारामती पोलिसांनी जेजुरी पोलिसांनी ही माहिती सांगितली तरीही बारामती पोलीस ट्रकचा पाठलाग करीत होते.

हे देखील पहा -

जेजुरी पोलिसांनी जेजुरी शहरात मोरगाव रस्त्यावर अवजड वाहने उभी केले तरी देखील ट्रक चालकाने एका सलून दुकान आणि हॉटेलच्या बाजूने ट्रक पुण्याच्या दिशेनं आणला. यात सलून दुकान आणि हॉटेलवाल्याचे नुकसान झाले आहे. Baramati police caught the thief in a filmy style

जेजुरीच्या पुढे सासवड रोडला हा ट्रक गेला. पुढे ट्रक चालकाने हायवेवर स्पीड वाढवली आणि पुन्हा भरधाव वेगाने जाण्यास सुरुवात केली. जेजुरी- सासवड रोडवर अरुंद पूलावर दोन अवजड वाहने पोलिसांनी आडवी उभी केली. आडवी वाहने पाहताच ड्रायव्हरने ट्रकचे स्पीड कमी करून क्लिनरने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मागून येणाऱ्या जेजुरी पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला पकडले.

यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाबा नाझरकर असे या आरोपीचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी आरोपीला बारामती पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT