बातम्या

भाजपसोबत युती फक्त निवडणूकीपुरती, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही- आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क

कल्याणः भारतीय जनता पक्षासोबत असलेली राजकीय युती फक्त निवडणूकीपुरती असून, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

कल्याण येथे गंगाधर पानतावणो साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात बोलताना आठवले म्हणाले, समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेतल्यानंतरच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय माझा एकट्याचा नाही. यापुढेही सर्वांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने आठवले यांना मारहाण केली होती. पक्षांतर्गत वाद हे मारहाणीचे कारण नसून, आठवले हे भाजपसोबत गेल्याने त्यांच्या विरोधात समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे वक्तव्य आंबेडकरी विचारवंतांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी भाजपशी युतीचा खुलासा केला.

Web Title: Alliance for BJP is only for election says ramdas athawale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

SCROLL FOR NEXT