बातम्या

भिंवडीत इमारत कोसळली,2 मृत्यू 5 जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क

भिवंडी येथील शांती नगर परिसरात एक चार मजली इमारत कोसळलीय..  इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ ते ५ व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. ही इमारत ८ वर्षे जुनी असून अनाधिकृतरित्या बांधण्यात आल्याची माहिती भिवंडी महापालिका आयुक्त अशोक रणखांबे यांनी 'एएनआय'ला सांगितले. दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 
शांती नगर परिसरात दुर्घटनाग्रस्त इमारत ८ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. इमारत उभारताना निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्याचे सांगण्यात येते. इमारतीच्या कॉलमला तडे गेले होते. त्यानंतर इमारतीत राहणाऱ्या लोकांनी आपले साहित्य काढण्यास सुरुवात केली होती. त्याचदरम्यान ही इमारत कोसळल्याचे सांगितले जाते. 

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल, एनडीआरएफचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यांना ४ ते ५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. 
दरम्यान, महापालिका आयुक्त अशोक रणखांबे यांनीही घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. ते म्हणाले की, इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यावेळी ही इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने आम्ही संपूर्ण इमारत रिकामी केली होती. पण काही लोक आमची परवानगी न घेता इमारतीत घुसले. त्याचवेळी ही इमारत कोसळली. ४ जणांना वाचवण्यात आले आहे. ही इमारत ८ वर्षांपूर्वीची असून ती अनाधिकृत आहे. याबाबत चौकशी केली जाईल.

Web Title : 2 dead and 5 injured in the Bhiwandi building collapse Rescue operations underway

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT