A 13 year old boy made many mechanical devices
A 13 year old boy made many mechanical devices 
बातम्या

लॉकडाउन काळात 13 वर्षाच्या मुलानं बनवलं यांत्रिक उपकरण

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकोला : कोरोना Corona महामारीमुळे सर्वत्र संचारबंदी Curfew असताना आणि शाळा School ही बंद असल्याने फावल्या वेळेत काय करावे, असा प्रश्न अनेक मुलांना पडला आहे. काहींनी त्याचा सदुपयोग केल आहे. या संधीचा फायदा घेत सातवीच्या मुलाने घरातच सोशल मीडियावर Social media पाहून कोडिंग करून काही उपकरण आणि गेम तयार केले आहे. A 13-year-old boy made many mechanical devices

हे उपकरण आणि हे गेम Game एकांतात राहणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. पलंगावर बसल्या- बसल्या स्वच्छता ठेवू शकतो, हवे तेव्हा लाईट Light बंद करू शकतो आणि फारच कंटाळा आला तर या यंत्रासोबत खेळू पण शकतो. ही किमया विधान अग्रवाल याने केली आहे. ऑटोमॅटिक Automatic यंत्रे निर्माण करून आपली वैज्ञानिक दृष्टी या माध्यमातून लहानपणीच सिद्ध केली. जुन्या आरटीओ परिसरातील रामी हेरिटेज येथील रहिवासी आणि जसनागरा पब्लिक स्कूलचा इयत्ता सातवीतील १३ वर्षीय विद्यार्थी विधान सुशिलकुमार अग्रवाल या विद्यार्थ्याने कोरोना संकटकाळाचा सदुपयोग करून अप्रतिम बाल यंत्रे साकारली आहे.

अनेक उपयुक्त यंत्रे टाकाऊ वस्तुपासून निर्माण केली आहेत. विधानने कोरोना महामारीत लॉकडाऊनमध्ये Lockdown घरी बसल्यावर मोबाईलच्या Mobile नादी न लागता वेळेचा सदुपयोग करीत घरातील अडगळीत पडलेल्या टाकाऊ वस्तुपासून यंत्रे निर्माण करण्यात वेळ घालविला. त्याने ऑटोमॅटिक यंत्रे निर्माण करून आपली वैज्ञानिक दृष्टी या माध्यमातून लहानपणीच सिद्ध केली आहे. A 13-year-old boy made many mechanical devices

नव्याने निर्माण केलेल्या या यंत्रांचा पहिला प्रयोग आपल्या सोसायटीमध्ये करून परिसरातील नागरिक व कुटुंबीयांना आश्चर्यचकित केल आहे. विधानने घरातील टाकाऊ वस्तुपासून ऑटोमेटीक सिझर गेम, सेन्सर बसविलेली ऑटोमॅटिक डस्टबिन, सेनिटायझरने हात धुण्याचे यंत्र निर्माण तयार केले आहे. या यंत्राच्या समोर हात ठेवल्याबरोबर मशीन सेन्सर ऍक्टिव्ह होऊन हेंडवाश बाहेर येतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकवर चालणारे तीनही अविष्कार विधानने कुशलतेने तयार केले आहेत. 

हे देखील पहा 

त्याच्या या प्रयोगामुळे परिसरातील नागरिक व त्याचे कुटुंबीय आश्चर्याने थक्क झाले आहेत. कल्पकतेने विज्ञानाच्या माध्यमातून आपण रचनात्मक प्रयोग करून अनुसंधानामध्ये आपली रुची असल्याचे विधानने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीत एकीकडे सर्व मुले मोबाईलमध्ये कार्टून व खेळ बघत टाइमपास करीत असताना विधानने आपला वेळ विधायक अनुसंधानासाठी खर्च करून आपल्या कल्पकतेची चुणूक या माध्यमातून सिद्ध केली आहे. A 13-year-old boy made many mechanical devices

त्याचे आजोबा रमेशचंद्र अग्रवाल व आजी प्रमिला अग्रवाल यांच्याकडून ही प्रेरणा मिळाली आहे. आपल्या कौतुकाचे श्रेय तो आपले वडील सुशिलकुमार अग्रवाल व आई सपना अग्रवाल, आजी आजोबा आणि विवेक गावंडे यांना देत आहे. त्याच्या या अफलातून प्रयोगाचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT