Yeola krishi Utpanna Bajar Samiti saam tv
ऍग्रो वन

Yeola krishi Utpanna Bajar Samiti : येवला बाजार समितीत व्यापारी- मापारींचा वाद विकाेपाला, उद्या कांदा लिलाव हाेणार की नाही?

Onion Auction : आजची कांदा आवक काढण्याचे दिले गेले आश्वासन.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Yeola Bajar Samiti News : व्यापारी आणि मापारी यांच्या वादामुळे आज (बुधवार) येवला बाजार समितीमधील कांदा लिलाव ठप्प झाला. दरम्यान त्यानंतर झालेल्या बैठकीत देखील काेणताच ताेडगा निघाला नाही. (Maharashtra News)

नाशिकच्या येवला बाजार समितीत आज सकाळी कांदा लिलाव सुरू झाले. त्यानंतर काही वेळाने व्यापारी व मापारी यांच्यात सौदा पट्टी वरून वाद झाला. हा वाद झाल्यानंतर मापारी यांनी कामकाज थांबविल्याने कांदा लिलाव प्रक्रिया बंद पडली.

त्यानंतर व्यापारी व मापारी यांची बाजार समिती सभापती यांच्या समवेत बैठक पार पडली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आज आलेली कांदा आवक काढून घेतली जाईल व उद्या या विषयावर व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगण्यात आले. या बैठकीत सौदापट्टी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या बाजार समितीचे लिलाव होणार की नाही याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT