Bogus Fertilizer Saam tv
ऍग्रो वन

Bogus Fertilizer : बनावट खत विक्रीप्रकरणी आर्णी- नेरमध्ये कारवाई; दोन विक्रेत्यांसह कंपनी प्रतिनिधींवर गुन्हा

Yavatmal News : खत विक्रीत आर्णी व नेर येथील कृषी केंद्रातून माती मिश्रित खते विक्री केली जात असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: शेतात लागवड केलेल्या पिकांच्या वाढीसाठी शेतकरी खत देत आहे. मात्र शेतकऱ्यांना बनावट खत देत वासवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व नेरमध्ये समोर आले असून कृषी विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन विक्रेत्यांसह कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खरीप हांगाच्या (Kharip Hangam) पार्श्वभूमीवर बियाणे व खतांचा साठा केला जात असतो. पीक लागवड केल्यानंतर शेतकरी खतांची खरेदी करत असतो. परंतु या खत विक्रीत आर्णी व नेर येथील कृषी केंद्रातून माती मिश्रित खते विक्री केली जात असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. याठिकाणी पथकाने खताची तपासणी केली असता यात माती मिश्रित खात आढळून आले. यामुळे सदर पथकाने दोन्ही दुकानावर कारवाई केली. 

दुकानांना सील लावत केला गुन्हा दाखल 

यवतमाळच्या (Yavatmal) नेर आणि आर्णी येथे विभागीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने कारवाई करून दुकानाला सील ठोकले. तसेच बनावट खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्थानिक व्यावसायिक आणि खत उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT