Nashik News Saam Tv
ऍग्रो वन

Nashik: सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) अडचणीत सध्या भर पडली आहे. कारण सोयाबीन (Soybean) पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महागड्या औषधांची फवारणी करून हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्याची सध्या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील येवला तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे.

हे देखील पाहा -

मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन मोठी होऊन फुलोरा अवस्थेत असताना त्यावर पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही अळी पानांमधील अन्न द्रव्य शोषून घेत असल्याने पानांवर छिद्रे पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी औषध फवारणी करण्याची वेळ सध्या बळीराजावर आली आहे. मात्र अळीचा प्रादुर्भाव पाहता त्याचाही कितपत फायदा होईल, हे सांगता येणं कठीण असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवसेना शिंदे ८० जागा लढण्याची शक्यता

Red Pumpkin Benefits: लाल भोपळा खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे!

Navneet Rana : 'बच्चू कडू करोडोंचा मालक झाला', नवनीत राणा यांचं वक्तव्य; कडू विरुद्व तायडे सामना रंगणार

Maharashtra Politics : बंडखोरीचा 'बाहुबली' पॅटर्न; पुतण्याचा नांदगावमध्ये बंड, महायुतीच्या उमेदवारानं काकांच्या मतदारसंघातच थोपटले दंड

Nandurbar Congress : राजेंद्र गावितांना उमेदवारीनंतर कॉग्रेसमध्ये अंतर्गत कलह; उमेदवारीसाठी ३ कोटी दिल्याचा उदेसिंग पाडवी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT