Soyabean  Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Market : बारदान नसल्याने पाच दिवसांपासून सोयाबीन खरेदी थांबली; विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रांवर गाड्यांच्या रांगा

Washim News : सुरुवातीला आद्रतेमुळे सोयाबीनची आवक कमी होती. पण नंतर शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर मोठी गर्दी केल्यानं बारदानाची टंचाई भासत आहे पाच दिवसांपासून रिकाम्या पोत्या अभावी नाफेडची खरेदी बंद

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी बाजार समितीमध्ये घेऊन येत आहेत. यामुळे प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सोयाबीन खरेदी गेल्या पाच दिवसांपासून ठप्प आहे. या समस्येमुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

नाफेडकडून शासकीय हमीभावा अंतर्गत वाशिम जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. अडीच महिन्यापूर्वी म्हणजे १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी झाली. यानंतर १५ ऑक्टोबरपासून ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव दराने सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने सोयाबीन विक्री न करता घरात साठवून ठेवला होता. मात्र आता चांगला दर मिळत असल्याने शेतकरी विक्रीसाठी सोयाबीन आणत आहे. 

पाच दिवसांपासून खरेदी थांबली 

दरम्यान वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ट्रॅक्टरमध्ये आपला माल घेऊन शेतकरी केंद्रांवर दाखल होत आहे. मात्र या केंद्रातील बारदान पाच दिवसांपासून संपले आहेत. बारदानचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी थांबली आहे. त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या लांबच लांब लागलेले आहेत.

सोयाबीन मोजणी करून घेण्याची मागणी 
गेल्या पाच दिवसांपासून रिकाम्या पोत्या अभावी नाफेडची खरेदी बंद आहे. सुरुवातीला आद्रतेमुळे सोयाबीनची आवक कमी होती. पण नंतर शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर मोठी गर्दी केल्यानं बारदानाची टंचाई भासत आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकायला अडचण येत असून, शेतकऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सोडून नाफेडच्या खरेदी केंद्रावर थांबावं लागत आहे. शासनाने त्यांची ही समस्या निकाली काढून शेतकऱ्याचे विक्रीस आणलेल्या सोयाबीन तात्काळ मोजणी करून घेण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT