Washim News Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : वीज पडून एकाचा मृत्यू, एकजण जखमी; वाशीम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह परतीचा पाऊस

Washim News ; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस आता परतीचा राहणार असून आज राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: पार्टीच्या पावसाळा आता सुरवात झाली आहे. या दरम्यान वाशीम जिल्ह्यातील काही भागात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यात वीज पडून एका शेत मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाल्याची घटना मालेगाव तालुक्यात घडली आहे.   

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस आता परतीचा राहणार असून आज राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले. दरम्यान (Washim News) वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे शेतात काम करत असलेल्या शेतकरी व मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. यात एका शेत मजुराचा (Lightning Strike) वीज पडून मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. प्रकाश मनोहर कांबळे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. सुदी शेत शिवारात शेत मजुरी करीत असताना हि घटना घडली.

सोयाबीन, कापसाचे नुकसान 
परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर कपाशीचे बोन्ड फुटले असल्याने कपाशी वेचणीवर आली आहे. मात्र पावसामुळे झाडावरील कापूस भिजून खराब होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT