Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim News : हळदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण; वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार सुरूच

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार होत असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात पुन्हा एकदा ५०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान जात आहे. 

वाशीम (Washim News) जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत सोमवारी कांडी हळदीला कमाल १४ हजार ६२५ आणि किमान १२ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळाले होते. यानंतर दोन दिवसांत हळदीचे दर पाचशे रुपयांनी घसरले असून रिसोड बाजार समितीत (Bajar Samiti) कांडी हळदीला कमाल १४ हजार १८० आणि किमान १३ हजार ३०० रुपयांचे दर मिळाले. दोन दिवसात हळदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

उत्पादक शेतकऱ्यांची अडचण 

हळदीला सुरवातीला चांगला दर मिळाला. दरम्यान आता बाजार समितीत होत असलेली आवक देखील कमी झाली आहे. या सोबतच दारात देखील घसरण होत असून हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT