Wardha Nafed Center Saam tv
ऍग्रो वन

Wardha Nafed Center : नाफेडची सोयाबीन खरेदी बंद; २२ कोटी ९० लाख रुपयाचे चुकारे नाफेडकडे थकीत

Wardha News : ६ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आठ केंद्रांवर एक लाख ५६ हजार ५०२ किलो सोयाबीनची हमीदराने खरेदी करण्यात आली. बहुतांश केंद्रांवर नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले होते

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: सोयाबीनचे बाजारातील भाव घसरले आहे. यामुळे सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून हमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात एकूण आठ खरेदी केंद्रावर सोयाबीनची नाफेडकडून खरेदी करण्यात आली. यात साधारण ७ हजार ८१८ शेतकऱ्यांनी सोयाबीन नाफेडला विकले आहे. शेतकऱ्यांची नाफेडकडे २२ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपयाचे चुकारे सध्या थकीत आहे. नाफेडणे सोयाबीन खरेदी पुन्हा सुरु करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून ९ हजार १२ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ हजार ९४६ शेतकर्‍यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. ६ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आठ केंद्रांवर एक लाख ५६ हजार ५०२ किलो सोयाबीनची हमीदराने खरेदी करण्यात आली. बहुतांश केंद्रांवर नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. पण काही केंद्रांवर मात्र शेतकर्‍यांचे सोयाबीन प्रलंबीत होते. 

५६ कोटी ६६ लाखाचे चुकारे दिले 

अनेक शेतकरी विविध अडचणींमुळे अखेरच्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आणू शकले नाही. यामुळे अनेक शेतकर्‍यांना सोयाबीन हमीदरात विकता आलेले नाही. त्याचा परिणाम शेतकर्‍यांचे सोयाबीन घरीच पडून आहे. यामुळे आता हमीदरात सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने शेतकर्‍यांपुढे आता सोयाबीन विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाफेडकडून शेतकऱ्यांना ५३ कोटी ६६ लाख १९ हजार ९४६ रुपयांचे चुकारे देण्यात आले आहे, तर २२ कोटी ८९ लाख ९१ हजार १८३ रुपयाचे चुकारे नाफेडकडे प्रलंबित आहे.

खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी 
जिल्ह्यात एकूण ९ हजार १२ शेतकऱ्यांनी नाफेडकडे सोयाबीन विक्रीची नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेडने खरेदी केला आहे. १ हजार १९४ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांकडेच आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पुन्हा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जातं आहे. सोबतच नाफेडने शेतकऱ्यांना सोयाबीनचे चुकारे सुद्धा तातडीने देण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT