Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Banana Crop : वादळी वाऱ्याने केळीचे पीक जमीनदोस्त, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Wardha News : वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील खडकी तसेच धोंडगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामध्ये मेहबूब अली नजर अली सैय्यद यांच्या शेतातील केळीचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तर अनेक भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. दरम्यान वर्धा जिल्ह्यात एका आठवड्यापासून सातत्याने पाऊस, वादळ होत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. वादळी पावसाने सेलू तालुक्यातील धोंडगाव शिवारात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये धोंडगाव शिवारातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतात असलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाले.

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील खडकी तसेच धोंडगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामध्ये मेहबूब अली नजर अली सैय्यद यांच्या शेतातील केळीचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. त्यांनी शेतात दोन एकरात केळी पिकाची लागवड केली होती. जून महिन्यात लावलेल्या केळी पिकासाठी वेळोवेळी मशागत केली. ड्रीप एरिगेशनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. खताचे व्यवस्थापन केले. वेळोवेळी उपाययोजना करत मे महिन्यापर्यंत शेतकऱ्याचे पीक जोमात आले. 

केळीवर अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च 

यावर्षी जून, जुलै महिन्यात शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळेल अशी आशा होती. परंतु वादळ आणि पावसाने शेतकऱ्याच्या या आशेवर पाणी फेरले. धोंडगाव शिवारात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने केळी जमिनदोस्त झाली असून झाडाला लागलेले केळीचे घड देखील जमिनदोस्त होत नुकसान झाले. दोन एकरात सुमारे ३ हजार झाडे लावली होती. पण अचानक आलेल्या वादळ, पावसाने होत्याचे नव्हते केले. अडीच लाख रुपयांचा उत्पादन खर्च या शेतकऱ्याला आला. आता तो खर्च देखील भरून निघेल की नाही यात शंका आहे. 

भरपाईची मागणी 

धोंडगाव शिवारात केळीचे उत्पादन घेणाऱ्या मेहबूब अली नजर अली सैय्यद, कौसर अली सैय्यद, इरफान अली मन्नान अली सैय्यद, इशान अली सैय्यद यांच्याही शेतात मोठे नुकसान या वादळाच्या तडाख्याने झाले आहे. साधारण ९० टक्के केळीचे झाड आडवे झाले आहे. नुकसानीची कृषी व महसूल विभागाला माहिती देण्यात आली. तलाठी व कृषी सहाय्यक हे शेतात आले त्यांनी पंचनामा देखील केला. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT