vegetables, Raju Shetti saam tv
ऍग्रो वन

Vegetables Price Slashed : भाज्यांचे दर गडगडले; दहा रुपयांपेक्षा कमी मिळताेय भाव, राजू शेट्टी चिंतेत

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज तब्बल 624 गाड्यांची आवक झाली.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Vegetables Price Slashed : एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज भाजीपाल्याचे भाव गडगडल्याचे चित्र हाेते. टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी तसेच सर्व पालेभाज्यांचे दर दहा रुपयांपेक्षा कमी मिळत हाेते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र हाेते.

शेतकरी नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी आज नवी मुंबईतील (navi mumbai) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजीपाल्याच्या घटलेल्या दरांबाबत चिंता व्यक्त केली.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज तब्बल 624 गाड्यांची आवक झाली. पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडलेत. टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर तसेच सर्व पालेभाज्यांचे दहा रुपयांखाली उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला.

आज एपीएमसी मधील भाज्यांचे दर प्रति किलो

कोबी - 7

टोमॅटो - 8

फ्लॉवर - 6

वाटाणा - 32 रुपये

कारली- 20

दुधी - 14

वांगी - 15

काकडी - 16

भेंडी - 27

फरसबी - 18

गाजर - 21

ढोबळी मिरची - 18

तोंडली - 20 ते 33

पडवळ - 20

घेवडा - 23

पालेभाजी प्रति जुडी दर

मेथी - 7

शेपू - 8

कोथिंबीर - 8

पालक - 7

कांदापात - 10

मुळा - 25

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT