unseasonal rain hits jowar wheat crops saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain Hits Part Of Nagar: नगरला अवकाळी पावसाचा तडाखा; ज्वारीसह गहू, हरभऱ्याची पिके झाली आडवी

सरकारने लवकर पिक विमा द्यावा शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

अहमदनगर शहरासह परिसरात सोमवारी झलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. नगर शहरासह जिल्ह्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे अनेक ठीकणी मोठ्या प्रमाणात गहू ,बाजरी, मका आणि हरभऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

जानेवारी महिना हा पिकांसाठी पोषक वातावरणाचा असतो मात्र थंडीच्या दिवसातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे उभे असलेली ज्वारी मका गहू आणि हरभऱ्याची पिके संपूर्ण आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभे राहिले आहे.

तीन महिन्यापूर्वी अशाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले होते. त्यावेळी सरकारने जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली नाही. तोच पुन्हा नवीन संकट शेतकऱ्यांसमोर आले आहे. हाता तोंडाशी आलेले पिके वाया गेल्यामुळे सरकारने पंचनामे न करता त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

Marutiच्या गाड्या लाखांनी स्वस्त होणार, S-Presso ते Wagon R कारच्या किंमतीत मोठी कपात, वाचा यादी

Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

Maharashtra Live News Update: पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

SCROLL FOR NEXT