tomato price slashed, nandurbar news saam tv
ऍग्रो वन

Tomato Price Drop : बाजार समितीत टोमॅटोला कवडीमाेल दर, शेतकरी चिंतेत; सरकारकडून मदतीची अपेक्षा

टाेमॅटाेचा परत कॅरेट रेट दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत जात असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : महिनाभरापूर्वी शंभर रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या टाेमॅटाेला आता कवडी माेल दर मिळू लागला आहे. बाजार समितीत सध्या टाेमॅटाे दोन ते तीन रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. यामुळे टाेमॅटाे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. (Maharashtra News)

टाेमॅटाेचे दर असेच पडत राहिले तर शेतकऱ्यांच्या लागवड खर्चही निघणार नसल्याने टाेमॅटाे उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बाजार समितीत जर भाव मिळणार नसेल तर टाेमॅटाे रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येऊन ठेपल्याचे शेतक-यांनी नमूद केले.

टाेमॅटाेचा परत कॅरेट रेट दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत जात असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे टाेमॅटाेचे दर वाढले तर सरकारकडून नेपाळ आणि इतर भागातून टाेमॅटाे आयात केले जातात मात्र दर पडल्यावर शेतकऱ्याला हमी भाव का दिला जात नाही असा प्रश्न उत्पादक शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT