technical problem arise 50 thousand farmers from beed in waiting for crop insurance money saam Tv
ऍग्रो वन

Beed News : 15 कोटींच्या अग्रीम विम्याची प्रतिक्षा, बीडचे 50 हजार शेतकरी चिंतातूर

दिवाळीपूर्वी पीक विमा अग्रीम मंजूर झाला होता.

विनोद जिरे

Beed News :

बीड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये (kharif season) नुकसान झालेल्या 50 हजार 800 शेतकऱ्यांचा, केवायसीसह तांत्रिक कारणांनी तब्बल 15 कोटी रुपयांचा अग्रीम विमा लटकला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या संदर्भात एआयसी कंपनीने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पीक विमा अग्रीम मंजूर झाला होता. त्यानुसार भारतीय पीक विमा कंपनीने दिलेल्या याद्यानुसार आतापर्यंत 7 लाखांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा अग्रीमची रक्कम जमा केली आहे.

दरम्यान अद्याप 50 हजार 800 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 15 कोटी रुपये जमा झाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ई- केवायसीसह इतर कारणांमुळे विम्याची रक्कम जमा झालेली नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही तांत्रिक समस्या लवकरच सुटेल अशी आशा आहे. या संदर्भात एआयसी कंपनीने राज्य शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागविले आहे असे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT