Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur saam tv
ऍग्रो वन

Raju Shetti News : शासन आपल्या दारी अभियानाऐवजी भ्रष्ट्राचाराची गंगा दारोदारी अभियान राबवावे : राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी ट्विट करुन साधला शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Raju Shetti News : राज्य सरकारने “शासन आपल्या दारी “अभियानाऐवजी “भ्रष्ट्राचाराची गंगा दारोदारी “हे अभियान राबवावे असे ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana president raju shetti) यांनी करुन शिंदे-फडणवीस सरकारवर जाेरदार हल्लाबाेल केला आहे. शेतक-यांप्रती काेणतीही आपुलकी नसलेले हे सरकार असल्याचे शेट्टींनी नमूद केले. (Maharashtra News)

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील तपोवन मैदान इथं या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात तब्बल दीड लाख लोक बसू शकतील इतका भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. तसेच पावसाची शक्यता वाटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात कोणताही व्यत्य येऊ नये यासाठी एक आलिशान मंडप देखील या परिसरात घालण्यात आलेला आहे.

दरम्यान शेतक-यांसाठी असलेल्या आणि आणल्या गेलेल्या अनेक याेजना फसव्या असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगत शिंदे फडणवीस सरकारवर ट्विट करुन टीका केली आहे.

शेट्टी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लबाड लांडगं ढोंग करतंय,गतिमान वेगवान सरकार असल्याचं सोंग करतंय. पीकविमा मिळेना, ऊसाचा अंतिम हप्ता ठरेना, प्रोत्साहनपर अनुदानाच तर मेळच लागेना असे लिहिले आहे.

पुढं शेट्टी लिहितात म्हणूनच सांगतो शेतकऱ्यांनो कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला यायला लागतंय. शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे उद्या (मंगळवार) काेल्हापूरातील शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमात नेमकी शेतकरी या भूमिका घेतात हे पाहवयास लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT