soyabean price, latur bazar samiti saam tv
ऍग्रो वन

Soyabean Market Price : स्थिरावलेला सोयाबीनचा दर उचल खाणार, शेतक-यांना अपेक्षा

अनेकांनी सोयाबीन घरीच साठवून ठेवले आहे.

दीपक क्षीरसागर

Soyabean Market Price : लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली आहे. या बाजार समितीत सोमवारी १० हजार ६८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ५५९० रुपयांचा कमाल, ५३७० रुपयांचा किमान तर ५ हजार ४५० रुपयांचा सर्वसाधारण दर (rate) मिळाला. (Latur Bazar Samiti News)

बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवक ३ हजार क्विंटलनी घटली आहे. दरही स्थिर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सोयाबीन (soyabean) प्रमुख पीक असून, यंदा पावणेपाच लाख हेक्टरवर पेरा झाला होता. त्यामुळे उत्पादनही चांगले झाले आहे. (Maharashtra News)

दरम्यान, यंदा सोयाबीन ५४०० ते ५५०० रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात दर वाढतील अशी शेतक-यांना अपेक्षा आहे. परिणामी अनेकांनी सोयाबीन घरीच साठवून ठेवले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वधारल्यास किंवा घडामोडी घडल्यास भाव वधारतील अशी अपेक्षा व्यापा-यांनी (traders) व्यक्त केली. सध्यातरी दर स्थिर राहणार आहेत असेच चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT