शेतात गुडघाभर पाणी साचल्याने सोयाबीन पीक धोक्यात... गजानन भोयर
ऍग्रो वन

शेतात गुडघाभर पाणी साचल्याने सोयाबीन पीक धोक्यात...

कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी

गजानन भोयर

वाशिम - मागील दोन दिवसांत वाशिम Washim जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे सोनखास गावासह जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान Damage झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने शेकडो एकर शेतीचं Farm नुकसान झाले आहे. दरम्यान सोयाबीन काढणीला आले असून, शेतात गुडघाभर पाणी असल्याने सोयाबीनची Soyabean काढणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे आज जर पाऊस झाला तर पीक हातचं जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील शेतकरी यंदा सोयाबीनची पेरणी केली तेव्हापासून चांगली मशागत केल्यामुळे सोयाबीन पीक बहरात होते.मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे सोयाबीन च्या शेतात गुडघा भर पाणी असल्याने पीक हातचं जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळं कृषी विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र यंदा ऐन सोयाबीन चा हंगाम जवळ आला असतांना पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2024: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राज्यासारखं आयुष्य; अचनाक बनू शकणार गडगंज श्रीमंत

Maharashtra Politics : बंडखोरांचा सांगली पॅटर्न यशस्वी होणार? राज्यात पुन्हा १९९५ ची पुनरावृत्ती होणार?

IND vs SA: हार्दिकचं टेन्शन वाढणार! हा स्टार ऑलराऊंडर पहिल्याच सामन्यात करु शकतो पदार्पण

Sharda Sinha : प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

SCROLL FOR NEXT