ambadas danve, eknath shinde, nanded, farmers, rain, farm saam tv
ऍग्रो वन

Ambadas Danve : शिंदे-फडणवीस सरकारनं पुसली शेतक-यांच्या तोंडाला पाने : अंबादास दानवे

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज नांदेड जिल्ह्य़ातील निळा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

संतोष जोशी

Ambadas Danve : राज्यात अतिवृष्टीमुळं (rain) शेतीची माेठं नुकासन झालेले आहे. अनेक ठिकाणी शेतात माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिक नष्ट झाली. राज्यातील नव्या सरकारनं पंचनामा करण्याचे आदेश दिले. ते पुर्ण झाले. त्यानंतर मिळालेली मदत म्हणजे सरकारनं शेतक-यांच्या ताेंडाला पाने पुसली असं म्हणावं लागेल असे विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी राज्य सरकारवर टीका केली. (Nanded Latest Marathi News)

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज नांदेड जिल्ह्य़ातील निळा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या पाहणी दाै-यात दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी काही शेतक-यांनी त्यांना मिळालेली मदत पूरेशी नसल्याचे सांगितलं. तर काही शेतक-यांनी पंचनामे याेग्य पद्धतीनं झाले नसल्याची तक्रार देखील दानवेंपुढं मांडली.

यावेळी दानवे यांनी माध्यमांशी बाेलताना राज्य सरकारनं केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हटलं. खरंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांना पुर्ण आणि तातडीने मदत मिळवावी यासाठी सभागृहात आवाज उठविणार आहाेत असे स्पष्ट केले. यावेळी शेतक-यांसह जिल्हाप्रमुख दत्तासाहेब कोकाटे, संपर्कप्रमुख धोंडु पाटील निळ, माजी आमदार रोहिदास चव्हाण उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT