Lemon Price Saam tv
ऍग्रो वन

Sangli Lemon Price Hike: अबब..लिंबूच्या दराने तोंडचे पाणी पळाले; एका लिंबूसाठी मोजावे लागताय इतके रूपये

अबब..लिंबूच्या दराने तोंडचे पाणी पळाले; एका लिंबूसाठी मोजावे लागताय इतके रूपये

विजय पाटील

Sangli News: लिंबू बघितला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण आज लिंबूचा दर भडकल्याने सर्वांच्‍या (Sangli News) तोंडाचे पाणी पळाले आहे. एक ते दोन रूपयाचा लिंबू आता १० ते १५ रूपये झाला आहे. या कडक उन्हाळयात लिंबुचा दर भडकाल्याने लिंबू सरबत ही महाग झाला आहे. (Latest Marathi News)

लिंबूला कधी नव्‍हे तो इतका दर मिळाला आहे. चांगल्या प्रतीचा लिंबू शेकडा ७०० ते ८०० रुपये दराने व्यापाऱ्यांना मिळतं आहे. यामुळे या ऊन्हात दिवसभर बसून लिंबू विकताना चार पैसे पदरात पडेनासे झाले आहे. लिंबू खरेदीला आलेले ग्राहक दर ऐकून आल्या पावली परत जाताना दिसत आहेत. एका लिंबूसाठी दहा ते पंधरा रूपये द्यावे लागत असल्‍याने ते न घेतलेलेच बरे असे ग्राहकांचे म्‍हणने आहे.

हॉटेलमध्‍येही लागल्‍या पाट्या

आवक कमी झाल्याने लिंबू महाग झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. लिंबूचे दर गगनाला पोहचले असल्‍याने आज हॉटेलमध्ये तर कोणत्याही पदर्थासोबत लिंबू मिळणार नाही असे बोर्ड लागले आहेत. आता जेवण, नाष्टा हा लिंबूशिवाय करण्याची वेळ खवयांवर आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

SCROLL FOR NEXT