Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : रब्बीसाठी १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा; जात तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश

Sangli news : प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न झाल्यामुळे नुकसान होते. पिकांच्या हंगामामध्ये पूर, पावसातील खंड, दुष्काळ तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट

विजय पाटील

सांगली : खरीप हंगामानुसार रब्बी हंगामात देखील पीक योजना राबविण्यात येत असते. याचा लाभ शेतकरी घेत असतात. दरम्यान रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सांगली जिल्ह्यातील १ लाख २ हजार ३१ शेतकऱ्यांनी पिक विमा घेऊन ६१ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण केले आहे. अर्थात अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना या विमा कवचमुळे मिळणार आहे. 

सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न झाल्यामुळे नुकसान होते. तसेच पिकांच्या हंगामामध्ये पूर, पावसातील खंड, दुष्काळ, तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट होते. तसेच पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्नात घट होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे.

जात तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग 

यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि यंदाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगाम पीक विमा घेणाऱ्यांची संख्या ४९ हजार १३६ वाढली आहे. तर सर्वाधिक दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी झाले आहेत.

अतिवृष्टी आणी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना ८१२ कोटी मंजुर
नांदेड
: नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबर २०२४ मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजूर केले आहेत. लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लाख इतकी रक्कम मंजूर केली आहे. ही रक्कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT