Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar News : लग्नाला दीड महिना झाला असतानाच काळाची झडप; शेती मशागत करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

Sambhajinagar News : शेतामध्ये मशागत करत असताना शेतात असलेल्या विद्युत मोटारीच्या वायरवर त्याचा पाय पडला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शेतात काम करत असताना मोटारीच्या उघड्या वायरवर पाय पडून विजेचा जोरदार झटका बसला. यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या विवाह मांडवा येथे घडली आहे.

खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरवात झाली आहे. तर मान्सूनचे आगमन झाल्याने पेरणीच्या कामाला देखील सुरवात झाली आहे. याच दरम्यान आपल्या शेतामध्ये मशागत करत असताना शेतात असलेल्या विद्युत मोटारीच्या वायरवर त्याचा पाय पडला. वायरमधील तार मोकडा असल्याने त्याला विजेचा जबर धक्का (Electric Shock) बसला. यात तरुणाचा मृत्यू झाला. योगेश बाळू बाबर (वय २५) असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे. 

दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न 

योगेशला विजेचा धक्का बसल्याने नातेवाईकांनी योगेशला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. (Sambhajinagar) दरम्यान योगेशचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले असून सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT