Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; ज्वारी- बाजरी यासह उन्हाळी पिके आडवी, वीज पडून गाईचा मृत्यू

Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ११ एप्रिलला जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) झाल्याने ष्टातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात (Sambhajinagar) संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे ज्वारी, बाजरीसह उन्हाळी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ११ एप्रिलला जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या झालेल्या पावसामुळे बाजरी, मका, ज्वारी (Jowar) यासह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होऊन ही पिके उध्वस्त झाली. तर दुसरीकडे तालुक्यातील निमखेडी शिवारात (Lighting Stike) वीज पडून एका गायीचा मृत्यू झालाय. सोयगावसह बनोटी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना (Farmer) चांगलाच तडाका दिल्यामुळे खरीप पाठोपाठ आता रब्बी आणि उन्हाळी पिके आडवी होऊन भुई सपाट झाल्याचे दिसून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

परळीत शिंदे-मुंडेंची MIM सोबत युती; भाजपनंतर शिंदे-मुंडेंचा MIMसोबत घरोबा, VIDEO

ब्लॅकमेल, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती; पोलिसाच्या जाचामुळे तरुणाने आयुष्य संपवलं

Blackheads Problem: चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT