Marathwada Rain Saam tv
ऍग्रो वन

Marathwada Rain : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण; मका- सोयाबीनला फुटले कोंब, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

sambajinagar News : सुरुवातीला लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झालं

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने वेचणीवर आलेली कपाशी पावसामुळे खराब झाली आहे. तर काढणीवर आलेल्या सोयाबीन व मक्याचे देखील नुकसान झाले आहे. 

गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस (Rain) सुरूच आहे. सुरुवातीला लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झालं. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. (Marathwada) काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. तर वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. सोयाबीन, मका, बाजरी ही पिके आडवी झाल्यानं कोंब फुटू लागले आहेत.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) विभागात रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत २९.१ मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ४५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर जालना जिल्ह्यात सरासरी ४४.८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामध्ये सर्वाधिक सरासरी ६२.२ मिलिमीटर पाऊस जालना तालुक्यात नोंदविला गेला.

धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. लातूर, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती मंडळात ७८.७५, परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात ६६, सेलू आणि मोरेगाव मंडळात ९४.५०, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ताल गोरेगाव मंडळ व सेनगाव मंडळात प्रत्येकी ७२.७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड शहर मंडळात ९५.२५८ ग्रामीणमध्ये ७०.५० मिलिमीटर पाऊस झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करणार- मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT