Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला; शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बहुतांश महसूल मंडळात सोयाबीन पिकावर येलो मोझक या बुरशीजन्य रोगाचा अधिकच प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, मूग आणि कपाशी पिकांवर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर महागड्या औषधांची फवारणी करण्याची वेळ आली आहे. 

संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बहुतांश महसूल मंडळात सोयाबीन पिकावर येलो मोझक या बुरशीजन्य रोगाचा अधिकच प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. यामुळे शेतकरी आपली पिके वाचवण्याची धडपड करत आहे. ऐन हंगामात येणाऱ्या काही दिवसात (Soyabean Crop) सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होऊन अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. अशातच येलो मोजॅकच्या रोगामुळे उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान याकडे कृषी विभागाने तातडीने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.

खर्चात अधिक भर 

सोयाबीनसह कपाशी, मूग पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हि रोगराई कमी करण्यासाठी शेतकरी (farmer) महागड्या औषधाची फवारणी करू लागला आहे. इतके करून देखील बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शिवाय आता अपेक्षित असलेल्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT