Mango Saam Tv
ऍग्रो वन

केशर आंब्याने शेतकऱ्याला बनवले 'लखपती'

पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकता अवलंबून फळबागेकडे वळा आणि भरघोस उत्पन्न घ्या.

विश्वभूषण लिमये

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी गावातील एका शेतकऱ्याने आंब्याच्या बागेतून लाखोंचा नफा मिळवलाय. तीन एकर शेतीत केशर आंब्याच्या माध्यमातून केदारनाथ बिराजदार यांनी तब्बल आठरा लाखाचा नफा कमवलाय. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षात त्यांनी आंब्याचे (Mango) पीक घेतले असून त्यांचा आंबा परदेशात निर्यात करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्याने (Farmer) दिली. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकता अवलंबून फळबागेकडे वळा आणि भरघोस उत्पन्न घ्या.

हे देखील पाहा -

दहा हजाराची नोकरी करत नोकर बनण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून शेती करा आणि नफा मिळवा असे आवाहन दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी केदारनाथ बिराजदार यांनी केले आहे.केदारनाथ बिराजदार यांनी माळरानावरील तीन एकरावर केशर आंब्याची लागवड करून आंबा बाग उभी केली आहे.

तीन वर्षात आंब्याच्या झाडाला फळ लागले असून त्यातून खर्च 2 लाख वजा जाता त्यांना 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. चांगले दर्जेदार आंब्याचे उत्पन्न त्यांनी घेतल्याने त्यांच्या आंब्याला परदेशातून मागणी आहे. तरुण मित्रांनी नोकरीच्या मागे न लागता फळबाग शेतीकडे वळून प्रगती साधावी असे आवाहनही त्यांनी तरुण शेतकऱ्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT