Sadabhau Khot  Saam Tv
ऍग्रो वन

Rayat Kranti Sanghatana : ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 500 रुपये द्या : सदाभाऊ खाेत

Sadabhau Khot : संघटनेचा विस्तार करण्यासाठी सदाभाऊ खाेत दिवाळी नंतर राज्याचा दौरा करणार आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी रयत क्रांती संघटनेने पहिल्या उचलीची मागणी केली आहे. एफआरपी अधिक 500 अशी पहिली उचल द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात केली. (Maharashtra News)

रयत क्रांती संघटनेची पंढरपुरात राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये विविध प्रकारचे 11 ठराव मंजूर झाले. मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 200 रूपये दिवाळी पूर्वी द्यावेत,10 एचपी पर्यंत शेतकऱ्यांना (farmers) मोफत शेतीसाठी वीज पुरवठा द्यावा, साखरेवरील निर्यात बंदी उठवावी,साखरेची किमान विक्रीची किंमत 3500 रूपये करावे, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या भागात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असे विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

नोव्हेंबर मध्ये इस्लामपूर येथे इंडिया विरुद्ध भारत अशी परिषद घेण्यात येणार असल्याचे ही खोत यांनी जाहीर केले. संघटनेचा विस्तार करण्यासाठी आपण स्वतः दिवाळी नंतर राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT