Ravikant Tupkar , Swabhimani Shetkari Sanghatana, Cotton Price Saam Tv
ऍग्रो वन

Ravikant Tupkar: कापसाला 'हा' भाव द्या, अन्यथा आंदाेलनास सामाेरे जा : रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या कापसाच्या बाबतीत तातडीने निर्णय झाला पाहिजे असे रविकांत तुपकर यांनी नमूद केले.

संजय जाधव

Ravikant Tupkar Latest Marathi News : कापूस उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. शेतक-यांच्या पाठीशी सरकार उभे राहणार नसेल तर आम्हांला आंदाेलन छेडावे लागेल असा इशारा रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी दिला आहे.

तुपकर म्हणाले सध्या कापसाचे दर स्थिर नसून दरात चढ उतार सुरू आहे. तर यावर्षी पाऊस जास्त झाल्याने कापसाचे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादन खर्च निघत नाहीये. त्यातच कापसाला साडेबारा हजार दर मिळणे अपेक्षित असताना निश्चित दर मिळत नाहीये असे तुपकर यांनी नमूद केले.

आठ हजार तर कधी साडेआठ हजार भाव कापसाला (cotton) मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

तुपकर म्हणाले शिवाय कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकार निर्णय घेत नाही ना असा सवाल ही त्यांनी केला आहे. त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांच्या (farmers) कापसाच्या बाबतीत निर्णय घ्या. अन्यथा आक्रमक आंदोलनाचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT