Ravikant Tupkar,  Saam Tv
ऍग्रो वन

'जसं श्रीलंकेत झालं तसं महाराष्ट्रातील नेत्यांना जनता रस्त्यावर फिरु देणार नाही'

स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकरांनी महाराष्ट्र सरकारवर डागली ताेफ.

संजय जाधव

बुलढाणा : विदर्भातील शेतक-यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने सरकारने द्यावी. सरकारनं असं केले नाही तर ज्या प्रकारे श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात जनता घुसली होती त्याप्रमाणे राज्यातील जनता लोकप्रतिनिधींना रस्त्यांवरुन फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी दिला आहे. उद्या (मंगळवार) पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना (farmers) तात्काळ मदत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभारणार आहाेत असा इशाराही तुपकर (ravikant tupkar) यांनी यावेळी दिला आहे. (Ravikant Tupkar News)

रवीकांत गेल्या दहा दिवसांत एकट्या विदर्भात अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र राजकारणी , आमदार हे मंत्रीपदाच्या फिल्डिंगमध्ये व्यस्त आहेत. एकाही आमदाराला शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. विदर्भातील शेतकऱ्याला या सरकारने वाऱ्यावर सोडलं असून ज्याप्रकारे रोम जळत होता आणि राजा बिगुल वाजवत बसला होता तशी अवस्था विदर्भाची झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती अस्थिर बनत चालली आहे. तीन तीन लाख लाेकांतून निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधींनी शेतक-यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरु केला आहे. विदर्भातील शेतक-यांना तातडीनं मदत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदाेलन छेडेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT