Raju Shetti, farmers, swabhimani shetkari sanghatana Saam TV
ऍग्रो वन

Raju Shetti News : साखर कारखानदारांना बक्कळ पैसे मिळालेत, हिशाेब चुकता करा अन्यथा धूराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी (पाहा व्हिडिओ)

त्यामुळे शेतक-यांनी केवळ एफआरपीच्या रकमेवर समाधाना का मानावे असा सवाल शेट्टींनी सरकारला केला आहे.

Prachee kulkarni

Pune News : टनाला एफआरपी पेक्षा 400 रुपये अधिक द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी (raju shetti latest marathi news) शासनाला केली आहे. याबाबत राजू शेट्टींनी २ ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या मागणीची पुर्तता न झाल्यास एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असेही शेट्टींनी नमूद केले. (Maharashtra News)

ऊस दराबाबत राजू शेट्टींनी आज (शुक्रवार) पुण्यात पत्रकार परिषदेत स्वाभिमानीची (swabhimani shetkari sanghatana) भूमिका विषद केली. ते म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून सरकार (मुख्यमंत्री) यांचा सोबत बैठका झाल्या. आम्ही सातत्याने मागणी करत होतो की मागचा सीझन साखर कारखान्यांच्या दृष्टीने चांगला झाला आहे. एफआरपी पेक्षा अधिक पैसे देण्याची क्षमता राज्यातील कारखान्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतक-याला अधिक पैसे दिले जावेत.

परंतु साखर आयुक्त कार्यालयात गेल्या तीन सीझनचा हिशोब करणे बाकी आहे. त्यामुळे सरकार नक्की काय करत आहे ? आयुक्तालय काय करत आहे? असा प्रश्न शेट्टींनी उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले साखरेचा विक्रीची किंमत ३४०० रुपये क्विंटल होती. ती आता ३८०० रुपये क्विंटल झाली आहे. ते पैसे केंद्राला द्यायला नको का? असा सवाल शेट्टींनी केला आहे. क्विंटलला पाचशे रुपये जादा मिळाले आहेत.

सरकराने साखरेचे उत्पादन कमी करून इथेनाॅलचे उत्पादन करण्याचे आदेश कारखान्यांना दिले. एक टक्क्या मधून ९ लिटर इथेनॉल उत्पादित होते. त्यातून १६७ रुपये यातून अतिरिक्त पैसे मिळताहेत असेही शेट्टींनी स्पष्ट केले.

त्यामुळे शेतक-यांनी (farmers) केवळ एफआरपीच्या रकमेवर समाधाना का मानावे असा सवाल शेट्टींनी सरकारला केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT