Sugarcane Cutting Saam tv
ऍग्रो वन

Sugarcane Cutting Rate: मशीनद्वारे ऊस तोडणीला ७०० रुपये दराची मागणी; संघटनेने केली मागणी

Pune News : प्रत्यक्षात हे दर एक समान केले जात नाहीत आणि दरवाढसुद्धा दिली जात नाही. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने सध्याच्या दरात मशिनद्वारे ऊस तोडणी करणे परवडत नाही.

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : राज्यातील ऊस तोडणी मजुरीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ऊस तोडणी मशिन मालकांनी मशिनने केल्या जाणाऱ्या उसाच्या (Sugarcane) तोडणीसाठी प्रतिटन ७०० रुपये दर देण्याची मागणी महाराष्ट्र ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने केली आहे. या मागणीसाठी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले आहे. (Latest Marathi News)

सध्या राज्याच्या विविध भागात मशिनने ऊस तोडणी करण्यासाठी दर वेगवेगळे आहेत. मुळात हे दर संपूर्ण राज्यभरात (Farmer) एक समान असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात हे दर एक समान केले जात नाहीत आणि दरवाढसुद्धा दिली जात नाही. त्यातच (Petrol) पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने सध्याच्या दरात मशिनद्वारे ऊस तोडणी करणे परवडत नाही. याशिवाय वाहतूक दरातसुद्धा वाढ जाहीर केली जात नसल्याने नाईलाजाने बेमुदत ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महाराष्ट्र ऊस तोडणी मशिन मालक संघटना निवदेनात नमूद केले आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर २० जानेवारीपासून ऊस तोडणी बंद 

महाराष्ट्र ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने केलेल्या मागणीनुसार दारात वाढ अपेक्षित आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास येत्या २० जानेवारीपासून मशिनद्वारे केली जाणारी ऊस तोडणी बंद करण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील थरारक ट्रेकिंग स्पॉट, पर्यटक येथे जाताना 100 वेळा विचार करतात

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT