सांगली  
ऍग्रो वन

एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..!

साम टीव्ही न्यूज .

सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी Farmer काकासाहेब सावंत यांनी एक नवीन प्रयोग केला आहे. एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. यातून ते दुष्काळी भागात उत्पादनातून लाखो रुपये कमवत आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत Jat तालुका हा दुष्काळग्रस्त भाग, याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी Nursery सुरू केली.

या दुष्काळी तालुक्यातील शेती Farming निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. काकासाहेबांना आपल्या निर्णयाबद्दल समाधान वाटते. कारण त्यांचे कुटुंब आज नर्सरीच्या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहे.

काका साहेबांनी आयटीआयमधून डिप्लोमा केलेला आहे. तर पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशक, काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात.

त्यातून त्यांना वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला आणि 22 प्रकारच्या आंब्याची लागवड सावंत यांनी केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हा प्रयोगयशस्वी केला. 

सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. केशर या आंब्याच्या जातीची लागवड जवळपास १० एकरांत करण्यात आली आहे.

तर उर्वरित १० एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सब्सिडीचा लाभ घेत नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी हे यश मिळवले आहे.

हे देखील पहा -

जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. ऑर्डरप्रमाणे काकासाहेब आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप ४० ते ७० रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळफास २ लाख आंब्याची रोपे विकतात.

याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव इत्यादी परिसरांतून लोक येतात.

तर यावर्षी त्यांना आश्चर्यकारकरित्या ४ लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यातून मोठे यश कमावणारे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जयंत पाटील - गोपीचंद पडळकर एकाच मंचावर, दोघांची एन्ट्री होताच नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Health Tips : आयर्नची कमतरता फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषांनीही जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

Private Bus Fares: टॅव्हल्सचा मनमानी कारभार, दिवाळीत प्रवाशांची लूट सुरू; पुणे ते नागपूर प्रवासासाठी ₹4200 भाडे

Maharashtra News Live Update: अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT