Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Parbhani News : यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली होती. मात्र अतिपावसामुळे कापूस खराब झाला होता. शिवाय कापसाला फुल धारणा देखील कमी झाली आहे

राजेश काटकर

परभणी : बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस वेचणी झाली आहे. तर दिवाळी झाल्यानंतर कापूस खरेदीला देखील सुरवात होत असून सेलू बाजार समितीत कापूस खरेदीच्या पहिल्याच दिवशी २५०० क्विंटल कापसाची आवक झाली असून सेलू, जिंतुरात सीसीआयकडून ७ हजार ५२१ भाव मिळाला आहे. 

यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली होती. मात्र अतिपावसामुळे कापूस खराब झाला होता. शिवाय कापसाला फुल धारणा देखील कमी झाली आहे. यामुळे उत्पन्न कमी येण्याची शक्यता आहे. दरम्यान परभणीच्या (Selu) सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे. तर (Cotton Price) कापूस खरेदीच्या पहिल्याच दिवशी २५०० क्विंटल कापूस दाखल झाला. 

दार वाढीची अपेक्षा 

सेलू शहरातील आठ कापूस जिनिंग प्रेसिंग सुरू झाल्या आहेत. खराडे सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याला साडेसात हजाराच्या वर दार मिळाला आहे. मात्र, सध्या कापसाला मिळत असलेल्या भावामुळे शेतीचा खर्चही निघत नसल्याने कापसाचे दर वाढतील; अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT