Selu Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Selu Bajar Samiti : तीन लाख क्विंटल कापूस खरेदीनंतर मार्केटचा काटा बंद

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सेलू शहरासह परिसरात जवळपास अकरा कापूस जिनिंग प्रेसिंग आहेत. त्यावर प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शहरात दरवर्षी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते

राजेश काटकर

सेलू (परभणी) : शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी आतापर्यंत सुरु होती. दरम्यान परभणीच्या सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डात यंदा लिलाव पद्धतीने खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. आता हि खरेदी बंद करण्यात आली आहे. या खरेदी केलेल्या कापूस खरेदीचा आकडा ३ लाख ७ हजार क्विंटलवर जाऊन पोहोचला आहे.

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सेलू शहरासह परिसरात जवळपास अकरा कापूस जिनिंग प्रेसिंग आहेत. त्यावर प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शहरात दरवर्षी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्याने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर पिके घेतली जातात. त्यातच सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, ह्यावर्षी (Cotton) कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली. परिणामी परिसरात कापसाचे लागवड कमी झाली असून सोयाबीनचा पेरा वाढला आहे. 

१५ जुलपासून खरेदी बंद 

भाव वाढेल या अपेक्षेवर अनेक महिने शेतकऱ्यांनी घरात कापूस भरून ठेवला होता. पण शेवट पर्यत भाव वाढ झाली नाही. यामुळे नाईलाजाने जो भाव मिळेल त्या दारात विक्री करावी लागली. यात (Selu) सेलू बाजार समितीत ३ लाख ७ हजार क्विंटलच्या वर कापूस खरेदी झाली. तर नव्यानेच स्थापन झालेल्या खासगी बाजार समितीकडून सव्वादोन लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून १५ जुलैपासून बाजार समितीची कापूस खरेदी बंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT