Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Parbhani News : सातत्याने पाऊस सुरु असल्याने पावसाचे पाणी शेतांमध्ये साचले आहे. परिणामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता दुहेरी संकट परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे आहे

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 
परभणी
: राज्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे आहे. मात्र या अस्मानी संकटासोबत सुलतानी संकट देखील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. कारण परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने नुकसान झाले असताना शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकाला ना फुल लागले ना शेंगा लागल्या. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.   

मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. शेतात सलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिके पूर्णपणे पाण्यात बुडाले असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यात पाहण्यास मिळत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सोयाबीनचे उत्पादन शून्य 

परभणी जिल्ह्यातील माळसोला शिवारातील काही शेतकऱ्यांना यंदा खरिप हंगामात मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात सोयाबीन लावलेल्या बियाण्याला शेंगा न आल्यामुळे शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. अर्थात या सर्व प्रकारामुळे उत्पादन शून्य झाले असून केलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. 

नुकसान भरपाईची मागणी 

परभणी जिल्ह्यातील माळसोना गावात शेतकरी जगन डिगांबर लाड, कैलास लाड, कृष्णा लाड आणि शशिकांत लाड यांनी ८ एकर शेतीवर पेरलेलं सोयाबीन पीक फुलधारणाच न झाल्याने शेंगाही तयार झाल्या नाहीत. या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर संबंधित कंपनीवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

SCROLL FOR NEXT