Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : लाखभर शेतकऱ्यांनी काढला ज्वारीचा विमा; परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Parbhani News : खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा उतरविण्याची सुविधा होती. आता रब्बी हंगामासाठी देखील ही एक रुपयात पीक विमा ही योजना सुरु

राजेश काटकर

परभणी : राज्य शासनाने रब्बी हंगामासाठी देखील एक रुपयात विमा काढण्याची योजना सुरु केली आहे. त्यानुसार शेतकरी पिकांना सुरक्षा कवच म्हणून पीक विमा (Crop Insurance) उतरवीत आहेत. (Parbhani) परभणी जिल्ह्यात देखील यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार २२ शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा व गहू या पिकाचा विमा उतरविला आहे. (Latest Marathi News)

शेती पिकांचे नुकसान होत असते. याकरिता खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा उतरविण्याची सुविधा होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी (Farmer) विमा काढला होता. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता रब्बी हंगामासाठी देखील ही एक रुपयात पीक विमा ही योजना सुरु करत शेतकऱ्यांना विमा काढण्याचे आवाहन केले जात आहे. शेतकरी देखील याला प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. परभणी जिल्ह्यात देखील साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्वारी पिकाचा विमा उतरविण्यासाठी राज्य शासनाने ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत एक रुपयांत स्वस्त असणारा हा विमा १ लाख ४८ हजार ४९० ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले आहे. खरिपात काढलेल्या विम्याची अग्रिम रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसली तरी शेतकरी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीचा विमा काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT