Pandharpur News Saam tv
ऍग्रो वन

Sangola News: अवकाळीने द्राक्ष बागांना फटका; शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान

Pandharpur News : या हंगामानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. मात्र यात देखील चांगले उत्पादन येण्याची शक्यता कमी आहे

भारत नागणे

सांगोला (पंढरपूर) : राज्यातील अनेक भागात मागील ३- ४ दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे (farmer) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात सांगोल्यात देखील अवकाळी (Pandharpur) पावसाने हजेरी लावल्याने येथील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. (Live Marathi News)

यंदा पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे या हंगामानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. मात्र यात देखील चांगले उत्पादन येण्याची शक्यता कमी आहे. यात आता अवकाळी पाऊस झाल्याने काही भागात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात सांगोला तालुक्याचा देखील समावेश आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद डोंगरगाव या भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. विशेषत: दुष्काळी भागात कष्टाने द्राक्षाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोट्यवधींचे नुकसान 

पावसापासून संरक्षण होण्यासाठी द्राक्ष बागेवर अच्छादन घातले होते. जमिनीवर चिखल होऊ नये यासाठी पेपर टाकला होता. मात्र अवकाळी पावसाने परदेशात निर्यात होणारी द्राक्षे खराब झाली आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले आहे.शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या परिसरात जाऊन नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT