महिला शेतकऱ्याने फुलवली सेंद्रिय बागायती शेती; झुकिनी भाजीची लागवड
महिला शेतकऱ्याने फुलवली सेंद्रिय बागायती शेती; झुकिनी भाजीची लागवड अभिजीत घोरमारे
ऍग्रो वन

महिला शेतकऱ्याने फुलवली सेंद्रिय बागायती शेती; झुकिनी भाजीची लागवड

अभिजीत घोरमारे

गोंदिया - प्रत्येकाला आवडीनुसार विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते, यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. हल्ली महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात उडी घेतली आहे. बहुधा आवड म्हणून नव्हे तर नाईलाजाने ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतात. मात्र गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) अर्जुनी मोरगावच्या निता लांजेवार या उच्च शिक्षण घेऊनही वैशिष्ट्यपूर्ण शेती करतात हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

निता लांजेवार यांनी ब्राह्मण टोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली आहे. गोंदिया जिल्हा धान शेतीचा आहे. सध्या उत्पादन वाढीसाठी शेतात रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. यामुळे दैनंदिन आहार हे सुद्धा विषयुक्त झाले आहे. सत्वहीन आहाराची सवय माणसाला जडत आहे.

हल्ली अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे शुद्ध असतील यावर विश्वासार्हता राहिली नाही. उत्पादन व त्यातून कमी उत्पन्न झाले तरी चालेल पण सेंद्रिय शेतीच करणार असे बोटावर मोजण्याइतके शेतकरी उरले आहेत. त्यातील एक म्हणजे निता लांजेवार. निता यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली आणि शेतात सेंद्रिय शेतीचा यशस्वी  प्रयोग केला. त्यांनी झुकिनी व इतर विदेशी पिकांची लागवड केली. झुकिनी ही विदेशी भाजी असल्याने स्थानिकांमध्ये तिची चव माहित नव्हती. पण हळूहळू आता या भाजीला प्रचंड मागणी वाढली आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादीत झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत.

तर लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देण्याचा मनोमन समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. निता यांच्या सारख्या इतरही महिलांनी सेंद्रीय  शेतीकडे वळल्यास शेतीमध्येसुद्धा महिलासुद्धा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

SCROLL FOR NEXT